सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई ढगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:24 IST2020-12-13T04:24:06+5:302020-12-13T04:24:06+5:30

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम ...

Mumbai cloudy for third day in a row | सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई ढगाळ

सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई ढगाळ

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अद्यापही मुंबईवर असून, सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीदेखील मुंबईमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली. तसेच शुक्रवारी झालेला पाऊस आणि हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात कमालीची घट झाली असून सोमवारनंतरच मुंबईकरांना मोकळ्या आकाशासह सूर्यनारायणाचे दर्शन घडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमधील हवामान रविवारीदेखील ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येतील. गेले तीन दिवस हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी खाली घसरले. आता मात्र यात वाढ हाेण्याची शक्यता आहे.

..........................................

Web Title: Mumbai cloudy for third day in a row