मुंबई ढगाळ!
By Admin | Updated: May 9, 2014 03:18 IST2014-05-09T03:18:46+5:302014-05-09T03:18:46+5:30
दक्षिण मुंबईवर बुधवारी पसरलेली धुळीची चादर गुरुवारी ओसरली असली तरी येथील ढगाळ वातावरण कायम होते.

मुंबई ढगाळ!
मुंबई : दक्षिण मुंबईवर बुधवारी पसरलेली धुळीची चादर गुरुवारी ओसरली असली तरी येथील ढगाळ वातावरण कायम होते. कमाल तापमान सरासरी ३४ अंशांच्या आसपास असण्यासह आर्द्रतेमधील कमी-अधिक फरकाच्या नोंदीमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. पुढील २४ तासांसाठी शहरातील वातावरण असेच राहण्याची शक्यता असून, मुंबईवर ढगाळ वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. मुंबई वगळता राज्यातील उर्वरित शहरांना पावसाने झोडपून काढले असतानाच मुंबईच्या वातावरणातही फेरबदल झाले. आर्द्रता कमी नोंदविल्याने उकाडा वाढला. शिवाय धुळीची चादर आणि ढगाळ वातावरणामुळे मुंबईकर बेहाल झाले. गुरुवारी यात काहीसा फरक पडला. धुळीची चादर ओसरली. हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोव्यात बर्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले. (प्रतिनिधी)
पावसाची शक्यता च्दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. च्उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहील. पुणे शहराच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.