Join us

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 06:45 IST

सहा वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी राज्य आणि केंद्राला पत्र लिहून या नामांतराची मागणी केली होती. या मागणीला राज्यातील कॅबिनेटने मार्च महिन्यात मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्राच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

लोकमत नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या अशा मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरशेठ टर्मिनस असे नामांतर केले जाणार आहे. नामांतराबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणा केली असता, केंद्रीय गृहराज्‍यमंत्री नित्‍यानंद राय यांनी सकारात्मक उत्तर दिले असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

सहा वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी राज्य आणि केंद्राला पत्र लिहून या नामांतराची मागणी केली होती. या मागणीला राज्यातील कॅबिनेटने मार्च महिन्यात मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्राच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. याबाबत राज्य सरकारने विधिमंडळात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर विलंब होण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे लवकरच नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळेल, अशी आशा आहे, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :भारतीय रेल्वे