मुंबई - जुनी तसेच वापरात नसलेली वाहने भंगारात काढण्याच्या मोहिमेत मुंबई सेंट्रल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) उल्लेखनीय यश मिळविले आहे.
भंगारातील टॅक्सी आणि बस यांच्या विक्रीतून २३ लाख ४४ हजार ४६० रुपयांचा महसूल मिळवत विभागाने अपेक्षेपेक्षा तिप्पट उत्पन्न मिळवले आहे. या माध्यमातून विभागाला अतिरिक्त महसूल मिळवून देण्यात मदत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे प्रदूषण नियंत्रण, रस्ते सुरक्षितता आणि वाहतूक सुलभता, या तिन्ही बाबींना चालना मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, भविष्यातही अशाच पद्धतीने भंगार वाहनांच्या विक्रीतून महसूल वाढविण्याचा विचार प्रशासनाचा आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व वाहनांची एकत्रित अंदाजे किंमत सुरुवातीला सुमारे सात लाख रुपये निश्चित केली होती. मात्र, एकत्रित लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याने धोरणात बदल करत प्रत्येक वाहनाचा स्वतंत्र लिलाव केला.
१५ वर्षांपेक्षा अधिक आयुर्मानाची वाहने भंगारात या मोहिमेंतर्गत १५ वर्षांपेक्षा जुनी एकूण २० वाहने भंगारात काढण्यात आली. त्यात जुन्या टॅक्सी व बस होत्या. ही वाहने दीर्घकाळ वापरात नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात पडून होती. त्यांची विल्हेवाट लावल्यामुळे मोकळी जागा उपलब्ध झाली.
दहापट अधिक प्रदूषण पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, १५ वर्षांहून जुनी वाहने नवीन वाहनांच्या तुलनेत दहापट अधिक प्रदूषण करतात. त्यामुळे अशा वाहनांना रस्त्यावरून हटवणे ही काळाची गरज आहे.
Web Summary : Mumbai Central RTO generated ₹23.44 lakhs by auctioning scrap vehicles, exceeding expectations. Twenty old taxis and buses were scrapped, freeing space and reducing pollution. Independent auctions proved more successful than collective ones. This initiative supports pollution control, road safety, and smoother traffic.
Web Summary : मुंबई सेंट्रल आरटीओ ने भंगार वाहनों की नीलामी से ₹23.44 लाख कमाए, जो उम्मीद से ज़्यादा है। बीस पुरानी टैक्सियाँ और बसें हटाई गईं, जिससे जगह खाली हुई और प्रदूषण कम हुआ। सामूहिक की तुलना में स्वतंत्र नीलामी अधिक सफल रही। यह पहल प्रदूषण नियंत्रण, सड़क सुरक्षा और सुगम यातायात का समर्थन करती है।