Join us  

Mumbai BMC budget 2023-24: पालिकेचा अर्थसंकल्प अवघ्या १८ मिनिटांत सादर, पाहा मुंबईकरांना काय मिळालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 11:36 AM

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थ संकल्पात १४ टक्क्यांची वाढ

Mumbai BMC Budget 202-3-24: बृहन्मुंबई महापालिकेचा २०२३-२४ साठीचा ५२,६१९.०७ कोटींचा मुख्य अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात शनिवारी सकाळी सादर करण्यात आला. अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांना अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थ संकल्पात १४ टक्क्यांची वाढ झाली. महापालिकेच्या एवढ्या आर्थिक वर्षात यंदा प्रथमच आयुक्तांनी १५ ते १८ मिनिटात अर्थसंकल्प सादर केला. एरवी हाच अर्थसंकल्प सादर करायला चार ते पाच तास लागतात. शनिवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. बरोबर १० वाजून ४८ मिनिटांनी त्याची सांगता झाली. अवघ्या १५ ते १८ मिनिटांच्या कालावधीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

मुंबई महानगरपालिका आरोग्य अर्थसंकल्प वैशिष्ट्ये-

  • २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये १२८७.४१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८०.१९ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
  • राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे.
  • नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याबरोबरच, के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एम. आर. आय. मशिन उभारण्यात येणार आहे.
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
  • स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १.४० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
  • किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ३५ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
  • असंसर्गजन्य रोग कक्षासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सदर उपक्रमासाठी १२ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • शिव योग केंद्रांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसूली खर्चाकरिता ५ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई महानगरपालिका बजेट २०१८बाळासाहेब ठाकरे