मुंबईचे तापमानही 3 अंशांनी घसरले
By Admin | Updated: November 25, 2014 02:04 IST2014-11-25T02:04:34+5:302014-11-25T02:04:34+5:30
मुंबईकरांना चाहूल देणा:या थंडीने शहरात आता चांगलेच बस्तान बसविले असून, मुंबापुरीच्या कमाल तापमानातही घट नोंदविण्यात येऊ लागली आहे.

मुंबईचे तापमानही 3 अंशांनी घसरले
मुंबई : मुंबईकरांना चाहूल देणा:या थंडीने शहरात आता चांगलेच बस्तान बसविले असून, मुंबापुरीच्या कमाल तापमानातही घट नोंदविण्यात येऊ लागली आहे. 35 अंशांवर पोहोचलेले शहराचे कमाल तापमान 3 अंशांनी घसरले असून, आता ते 32 अंश सेल्सिअसएवढे नोंदविण्यात येऊ लागले आहे.
भारतातून परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर आणि ईशान्य मोसमी पावसाचे देशाच्या पूर्व-दक्षिण भागात आगमन झाल्यानंतर वातावरणात बदल झाले होते. शिवाय समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ, या बदलामुळे मुंबईचे किमान तापमान 24 अंशांनी घसरले होते. मात्र पुन्हा त्यात वाढ होऊन ते 26 ते 28 अंश एवढे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग वाढल्याने राज्यासह मुंबईचे किमान तापमान खाली आहे. मात्र कमाल तापमान
35 अंशांवरच होते. परंतु आता किमान तापमान खालावल्याने वातावरणातील गारव्यामुळे कमाल तापमानही खाली घसरले आहे.
दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुढील 24 तासांसाठी राज्यातही हवामान कोरडे राहील आणि मुंबईतील आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)