Join us

मुंबई विमानतळावरील धावपट्टी 6 तास बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 08:22 IST

मुंबई विमानतळावरील धावपट्टी मंगळवारी (23 ऑक्टोबर) 6 तासांसाठी बंद राहणार आहे.  सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये धावपट्टी बंद राहणार आहे.

मुंबई : मुंबईविमानतळावरील धावपट्टी मंगळवारी (23 ऑक्टोबर) 6 तासांसाठी बंद राहणार आहे.  सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये धावपट्टी बंद राहणार आहे. मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी धावपट्टी सहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुंबई विमानतळावरून एकही उड्डाण होणार नाही किंवा एकही विमान विमानतळावर उतरणार नाही. एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना धावपट्टी बंद राहण्याच्या कालावधीत अधिक तपशीलासाठी एअर इंडियाची वेबसाईट, अॅप किंवा कॉल सेंटरला भेट देण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :विमानतळमुंबई