लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: सांताक्रुझ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेट क्रमांक ८ येथे जनरल एव्हिएशन टर्मिनलजवळ मत्स्यालयाची टाकी बसविण्याचे काम बुधवार आणि गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. या कामासाठी अवजड साधनसामुग्री व यंत्रसामुग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाकोला वाहतूक विभागाने मिलिटरी कॅम्प जंक्शन ते विमानतळ गेट क्रमांक ८ ते एअरपोर्ट कॉलनी जंक्शन या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहेत.
प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा करा वापर
पश्चिम उपनगर वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त अजित बोऱ्हाडे यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मिलिटरी कॅम्प जंक्शन ते विमानतळ गेट क्रमांक ८ ते एअरपोर्ट कॉलनी जंक्शन हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू रोडने येणाऱ्या वाहनांना कलिना जंक्शन मार्गे पुढे जाण्याचे निर्देश दिले आहेत.