मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:21+5:302021-02-05T04:25:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. याखेरीज, आणखी ...

मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. याखेरीज, आणखी एख सकारात्मक बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २४४, तर आतापर्यंत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५९ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत रविवारी ४८३ रुग्ण आणि ८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ८ हजार ९६९ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ३५१ झाला आहे. सध्या ५ हजार ७९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के असून, २४ ते ३० जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.१२ टक्क्यांवर गेला आहे. शहर उपनगरात आतापर्यंत कोरोनाच्या २८ लाख ४ हजार १८२ चाचण्या झाल्या आहेत.
शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १९९ असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार ८६ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २ हजार ४०३ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.