मुंबईत १८० सहा. निरीक्षकांच्या बदल्या
By Admin | Updated: August 6, 2015 01:46 IST2015-08-06T01:46:01+5:302015-08-06T01:46:01+5:30
मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत १८० साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. त्यात पदोन्नती होऊनही दीड महिन्यापासून

मुंबईत १८० सहा. निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत १८० साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. त्यात पदोन्नती होऊनही दीड महिन्यापासून वंचित राहिलेल्या ११९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी नवनियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधितांना त्वरित कार्यमुक्त करण्याची सूचना वरिष्ठ निरीक्षकांना केली आहे. रमजान महिना व त्यानंतर याकूब मेमनच्या फाशी प्रकरणामुळे या बदल्या रखडलेल्या होत्या. पोलीस महासंचालकांकडून जून महिन्याच्या अखेरीस मुंबईत कार्यरत असलेल्या ११९ उपनिरीक्षकांची पदोन्नती मुंबईमध्ये केली होती. त्याशिवाय अन्य ठिकाणांहून बदलून आलेले १८ अधिकारी नियंत्रण कक्षात संलग्न होते. त्यांच्याबरोबर अन्य ४३ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती अर्जावरून विविध शाखा व पोलीस ठाण्यांतर्गत बदली केली. (प्रतिनिधी)