मुलुंडमध्ये तरुणाने स्वत:वरच केले वार

By Admin | Updated: January 6, 2015 00:51 IST2015-01-06T00:51:45+5:302015-01-06T00:51:45+5:30

राज्यात जादूटोणा विधेयक लागू झाले आहे तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या युगाचा सध्या बोलबाला आहे.

In Mulund, the youth have done themselves only | मुलुंडमध्ये तरुणाने स्वत:वरच केले वार

मुलुंडमध्ये तरुणाने स्वत:वरच केले वार

मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
राज्यात जादूटोणा विधेयक लागू झाले आहे तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या युगाचा सध्या बोलबाला आहे. अशातच एका कुटुंबाने मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचे टाळून तांत्रिकाकडे धाव घेण्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. मुलुंडमधील कुटुंबाबाबतचे हे वास्तव नुकतेच समोर आले.
एका तरुणाने अंगात देव संंचारला म्हणून चक्क मानेवर चाकूने पाच ते सहा वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या तरुणावर आता त्याच्यावर पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलुंड पश्चिमेकडील जुना मुलुंड परिसरात हा तरुण आई-वडील, मोठा भाऊ आणि बहिणीसह राहण्यास आहे. वडील बीपीटीमध्ये कामाला आहे, तर भाऊ सुरक्षा एजन्सीत काम करतो. रविवारी रात्री घरी जेवण उरकल्यानंतर साडेबाराच्या दरम्यान घराबाहेर पडलेला तरुण रात्रभर घरी परतला नाही. एकदम सकाळी पावणेसहाला तो घरी आला आणि अस्वस्थ वाटत असल्याचे घरच्यांना सांगितले. आपण देव आहोत, अगरबत्ती, नारळ-लिंबूसारख्या गोष्टींंची मागणी तो करू लागला. भांबावलेल्या त्याच्या कुटुंबीयांना काही कळण्याच्या आतच जवळच असलेला चाकू उचलला आणि कुणाचा गळा कापू, तुमचा की माझा? असे बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:वरच वार करण्यास सुरुवात केली. वडिलांनी कसाबसा त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला आणि रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाला तत्काळ अग्रवाल रुग्णालयात नेले. मात्र तिथेही या तरुणाने गोंधळ घातला. त्याला आवर घालण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदार नरेंद्र शिंदे यांंच्या अंगावरही हा तरुण धाऊन गेला. अशात त्याला कसेबसे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विशिष्ट प्रकारचे आवाज कानावर पडत असल्याने आपण वेगळे कोणीतरी असल्याचा भास होत असल्याचे या तरुणाने सांगितले. मुलुंड पोलिसांनादेखील ही माहिती समजताच त्यांनीही रुग्णालयाकडे धाव घेत तरुणाच्या वडिलांंचा जबाब नोंदवून घेतला. हा तरुण दारूच्या आहारी गेला असून दारूच्या नशेत त्याने अंगावर वार करून घेतल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.

कुटुंबीयांनी घेतला अंधश्रद्धेचा आधार
च्आईच्या निधनांतर हा तरुण एकटाच राहत होता. दहावीनंतर त्याने शिक्षणही सोडले आहे. वडील आणि मी कामावर जात असल्याने तो घरात एकटाच राहत होता. अशातच तो दारूच्या आहारी गेला. वर्षभरापासून त्याच्या विचित्र वागणुकीमुळे आम्हीही घाबरलो. अंगात येत असल्याचे सांगून अगरबत्ती, नारळ-लिंबू अशी मागणी तो करतो. दोन महिन्यांपूर्वीही त्याने हाताची नस कापून घेतली होती. यासाठी त्याला दोनदा बुवाबाबांकडेही नेण्यात आले होते, अशी माहिती या तरुणाच्या मोठ्या भावाने दिली.

मानसोपचारतज्ज्ञाची गरज
कुठेतरी लहानपणापासून भेडसावणारी एकटेपणाची भावना, त्यातून नकळत जडलेल्या विविध गोष्टीमुळे वेगळ्या जगात वावरत असल्याचे सारखे वाटते. त्यातूनही आत्महत्येचा पर्याय निवडणे ही गंभीर बाब आहे. अशा अवस्थेत या तरुणाला तत्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याची गरज आहे.
- डॉ. युसूफ माचिसवाला,
मानसोपचार तज्ज्ञ
मानसोपचार विभागप्रमुख, जे.जे. रुग्णालय

Web Title: In Mulund, the youth have done themselves only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.