मुलुंड ज्येष्ठ महिला लूट प्रकरण

By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:03+5:302015-07-12T21:58:03+5:30

गॅस कर्मचार्‍यांची चौकशी सुरु

Mulund Senior Lady Loot Case | मुलुंड ज्येष्ठ महिला लूट प्रकरण

मुलुंड ज्येष्ठ महिला लूट प्रकरण

स कर्मचार्‍यांची चौकशी सुरु
मुलुंड ज्येष्ठ महिला लूट प्रकरण
मुंबई: महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी बनून मुलुंडमधील ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन लुटण्यात आले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांनी ५२ गॅस कर्मचार्‍यांची चौकशी केली असून अधिक तपास सुरु आहे.
मुलुंड पुर्वेकडील नवघर रोड येथे ७६ वर्षीय सरोजिनी नायडू राव पतीसोबत राहण्यास आहे. बुधवारी महानगर गॅस कंपनीतून गॅस रिडिंगसाठी आलेल्या तरुणाने त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली. महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी बनून आलेल्या तरुणाने दुसर्‍या दिवशी घरात एकट्या असलेल्या राव यांच्या तोंडाला रुमाल बांधून दागिन्यांची लूट करुन तो पसार झाला. यामध्ये त्यांचे २ लाख २८ हजारांचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु आहे.
याप्रकरणी महानगर गॅस कंपनीच्या कर्मचारी वर्गाच्या माहितीचा तपशील तपासण्यात येत आहे. आत्तापर्यंत ५२ महानगर गस कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मुलुंड नवघर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mulund Senior Lady Loot Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.