मुकेश अंबानींची बीएमडब्ल्यू ८.४१ कोटींची

By Admin | Updated: May 19, 2015 00:22 IST2015-05-19T00:22:16+5:302015-05-19T00:22:16+5:30

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची सुरक्षा लक्षात घेता त्यांच्यासाठी महागडी अशी संपूर्ण बुलेटप्रुफ आणि सोयिसुविधांनी सज्ज असलेली कोट्यवधींची बीएमडब्ल्यू ताफ्यात आणण्यात आली.

Mukesh Ambani's BMW 8.41 crore | मुकेश अंबानींची बीएमडब्ल्यू ८.४१ कोटींची

मुकेश अंबानींची बीएमडब्ल्यू ८.४१ कोटींची

मुंबई : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची सुरक्षा लक्षात घेता त्यांच्यासाठी महागडी अशी संपूर्ण बुलेटप्रुफ आणि सोयिसुविधांनी सज्ज असलेली कोट्यवधींची बीएमडब्ल्यू ताफ्यात आणण्यात आली. या कारवरुन बरीच चर्चा रंगलेली असतानाच आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनीदेखिल ही कार विकत घेतली आहे. या कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओत करण्यात आली असून तब्बल ८ कोटी ४१ लाख रुपये त्याची किंमत असल्याचे सांगण्यात आले. ही कार जर्मनीहून आयात करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी २0१0 मध्ये २७ मजल्यांचे अ‍ॅन्टेलिया नावाने रहिवासी संकुल उभारले. अत्यंत महागड्या अशा या रहिवासी इमारतीची बरीच चर्चा झाली. यानंतर आता अंबानी यांनी ८ कोटी ४१ लाख रुपये खर्चुन बीएमडब्ल्यू ७६0-एलआय या प्रकारातील बुलेटप्रुफ कार विकत घेतली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यातही याच मॉडेलमधील कार आहे. अंबानी यांच्या या नव्या कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओत करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावाने या कारची नोंदणी ७ मे रोजी करण्यात आली असून तब्बल २0 टक्के टॅक्स कंपनीकडून वन टाईम पे करण्यात आला आहे. हा टॅक्स १ कोटी ६८ लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कार बुलेटप्रुफ असून वायफाय, एलईडी लाईट्स, कॅमेऱ्यासह अन्य सुविधा आहेत. महत्वाची बाब म्हणजे व्हिआयपी नंबर मिळावा यासाठी रिलायन्सकडून प्रयत्न होत होते. त्यासाठी त्यांनी बीएस सिरिजमधील नंबर मिळविला असून त्यासाठी तब्बल २ लाख १0 हजार रुपये मोजले आहेत. (प्रतिनिधी)

भारतातील दुसरी कार
च्पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात अशाप्रकारची पहिली कार असून त्यानंतर अशी दुसरी कार मुकेश अंबानी यांच्याकडे आल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Mukesh Ambani's BMW 8.41 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.