Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' तारखेला होणार आकाश अंबानी आणि श्र्लोकाचा साखरपुडा, डिजिटल कार्ड व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:21 IST

अंबानी परिवाराने पाहुण्यांसाठी हे खास डिजिटल कार्ड तयार केलं असून त्यातील तारखेनुसार येत्या 30 जूनला हा साखरपुडा होणार आहे. 

मुंबई : मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी लवकरच श्र्लोका मेहतासोबत साखरपुडा करणार आहे. या साखरपुड्याचं डिजिटल कार्ड सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. अंबानी परिवाराने पाहुण्यांसाठी हे खास डिजिटल कार्ड तयार केलं असून त्यातील तारखेनुसार येत्या 30 जूनला हा साखरपुडा होणार आहे. 

या कार्डची खासियत म्हणजे या कार्डमध्ये 'काय पो चे' सिनेमातील 'हे शुभारंभ मंगल बेला आई' हे गाणं टाकण्यात आलंय. सोबतच कार्डमध्ये आकाश अंबानी आणि श्र्लोक मेहताचा फोटोही देण्यात आलाय. दोघांचा साखरपुडा अॅंटीलियामध्ये होणार आहे. 

24 मार्च रोजी गोव्यात दोघांची प्री-एंगेजमेंट सेरमनी झाली होती. यावेळी काही खास मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. इथे आकाश आणि श्र्लोकने फोटोशूटही केले होते. आता त्यांचा साखरपुडा होत आहे. पण त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाहीये. 

कोण आहे श्र्लोका?

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर श्र्लोकाने प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधून अॅंथ्रोपॉलिजीचं शिक्षण घेतलं. पुढे तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिमधून मास्टर्स केलं. 2014 पासून ती रोसी ब्लू फाउंडेशनमध्ये डिरेक्टर पदावर काम करते. त्यासोबतच ती कनेक्टफॉर नावाच्या एका संस्थेत को-फाऊंडरही आहे. 

टॅग्स :आकाश अंबानीमुकेश अंबानी