Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानी 'आजोबा' झाले; आकाश-श्लोकाला पुत्ररत्न

By मोरेश्वर येरम | Updated: December 10, 2020 18:22 IST

अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत ही गोड बातमी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआकाश आणि श्लोका यांना आज पुत्ररत्नाचा लाभ झालागेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात आकाश आणि श्लोका यांचा विवाह झाला होतानीता आणि मुकेश अंबानी आता आजी-आजोबा झाले आहेत

मुंबईदेशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असलेल्या अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आता आजी-आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. 

अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत ही गोड बातमी देण्यात आली आहे. नवजात बाळ आणि श्लोका अंबानी या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

आकाश अंबानी आणि श्लोका यांचा २०१९ मध्ये मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. संपूर्ण जगभरात या राजेशाही लग्नाची चर्चा झाली होती. लग्न सोहळ्याला आंतरराष्ट्रीय पाहुणेमंडळींपासून सिनेसृष्टी, क्रीडा, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. आकाश आणि श्लोका हे दोघंही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत होते. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच दोघांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं. 

टॅग्स :आकाश अंबानीमुकेश अंबानीआकाश अंबानी लग्न