राज यांच्या सभेला व्हॅलेंटाइनचा मुहूर्त
By Admin | Updated: February 13, 2017 05:26 IST2017-02-13T05:26:34+5:302017-02-13T05:26:34+5:30
मुंबईसह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचाराचा सध्या धडाका सुरू आहे. मागील महापालिका निवडणुकीत

राज यांच्या सभेला व्हॅलेंटाइनचा मुहूर्त
मुंबई : मुंबईसह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचाराचा सध्या धडाका सुरू आहे. मागील महापालिका निवडणुकीत आपल्या भाषणांनी मैदान गाजविणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप एकही प्रचारसभा संबोधित केली नाही. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर मनसेतील सामसूम आता संपण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे याच दिवशी प्रचारसभांना सुरुवात करणार आहेत.
विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे पहिली प्रचारसभा संबोधित करणार आहेत. त्यानंतर रात्री साडेसात वाजता विलेपार्ले येथे दुसरी सभा संबोधित करतील.
राज ठाकरे मुंबईत एकूण ३ प्रचारसभा घेणार असून, तिसरी सभा १८ फेब्रुवारीला दादरमध्ये होणार आहे. तसेच ठाणे, नाशिक आणि पुण्यातही राज ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. (प्रतिनिधी)