Join us

एमटीएनएल कर्मचारी जून महिन्याच्या वेतनाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 01:06 IST

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) च्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये व अधिका-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मुंबई : जुलै महिन्याचा पंधरवडा उलटत आला तरी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) च्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये व अधिका-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नोव्हेंबर महिन्यापासून एमटीएनएल कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणारे वेतन होण्यासाठी आता किमान पुढील महिन्याचा दुसरा आठवडा ते तिसरा आठवडा ओलांडला जात आहे. त्यामुळे कर्मचाºयांना व अधिकाºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जून महिन्याचे वेतन नेमके कधी होणार याबाबत अद्याप काही परिपत्रक काढण्यात आलेले नसल्याने कर्मचारी व अधिकाºयांमध्ये वेतन नेमके कधी होणार याबाबत संभ्रम आहे. वेतन अनियमितपणे होत असल्याने काही जणांचे गृहकर्जाचे हफ्ते वेळेवर जात नसल्याने त्यांना विनाकारण गेले काही महिने आर्थिक दंड भरावा लागत आहे.