बीएसएनएलच्या सापत्न वागणुकीविरोधात एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 06:02 IST2019-01-04T05:50:19+5:302019-01-04T06:02:26+5:30
सांताक्रुझ येथील कार्यालयात ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनांनंतर बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक पीयूष खरे यांनी एमटीएनएलची सेवा बंद करण्याबाबतचे निर्देश रद्द करण्याची ग्वाही दिली.

बीएसएनएलच्या सापत्न वागणुकीविरोधात एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)ची सेवा दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कर्मचाºयांनी एमटीएनएलऐवजी खासगी सेवा कंपनीची सेवा घ्यावी, असे अजब निर्देश देऊन एमटीएनएलची प्रतिमा खराब करणाºया बीएसएनएलच्या मुख्य महाव्यवस्थापकांना एमटीएनएलच्या कर्मचारी व अधिकारी संघटनांनी गुरुवारी घेराव घातला व त्यांच्याविरोधात निदर्शने केली.
सांताक्रुझ येथील कार्यालयात ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनांनंतर बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक पीयूष खरे यांनी एमटीएनएलची सेवा बंद करण्याबाबतचे निर्देश रद्द करण्याची ग्वाही दिली. एमटीएनएल व बीएसएनएल या दोन्ही कंपन्या दूरसंचार खात्याशी संबंधित असताना व सरकारी कंपन्या असताना सरकारी कंपन्यांच्या सेवेवर ठपका ठेवत खासगी कंपन्यांची सेवा घेण्याची परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न एमटीएनएलच्या कर्मचाºयांनी या वेळी उपस्थित केला. एमटीएनएल व बीएसएनएल या दोन्ही कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झालेला असताना अशा निर्णयामुळे त्याचा भंग होत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.
दोन्ही विभागांच्या प्रमुख अधिकाºयांमध्ये चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी खरे यांनी दिल्याची माहिती एमटीएनएल कामगार संघटनेचे सरचिटणीस दिलीप जाधव यांनी दिली. महानगर टेलिफोन निगम कामगार संघटनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना पत्र पाठवून योग्य निर्णय घेण्याची मागणी केली होती. आंदोलनात एमटीएनएल कामगार संघटना, एमटीएनएल एक्झ्क्यिुटिव्ह असोसिएशन व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.