माउंट एव्हरेस्टचा विलक्षण थरार..
By Admin | Updated: September 17, 2014 00:57 IST2014-09-17T00:57:53+5:302014-09-17T00:57:53+5:30
पिता आणि मुलगी यांच्यात वात्सल्य-प्रेमाचे भावबंध आई आणि मुलगी यांच्यापेक्षा अधिक घट्ट, अधिक चिवट असतात असं आढळून आलंय.

माउंट एव्हरेस्टचा विलक्षण थरार..
पूजा सामंत ल्ल मुंबई
पिता आणि मुलगी यांच्यात वात्सल्य-प्रेमाचे भावबंध आई आणि मुलगी यांच्यापेक्षा अधिक घट्ट, अधिक चिवट असतात असं आढळून आलंय. पण, सख्ख्या, पोटच्या लेकीचा पित्याने दुस्वास केला तर.. ही कल्पना नाही ना सहन होत़
पण, असंही होऊ शकतं. दोन लगतच्या खोल्यांमध्ये असलेले पिता आणि पुत्री. पण पित्याची गळाभेट घ्यायला लेकीला त्याचं आधी मन जिंकावं लागतं. साधंसुधं नव्हे, तर माउंट एव्हरेस्टसारखं जगद्विख्यात हिमशिखर तिला जिवाची बाजी लावून चढावं लागतं. अशी मध्यवर्ती कल्पना असलेल्या ‘एव्हरेस्ट’ मालिकेविषयी खूप उत्सुकता वाटण्याचं आणखी एक सशक्त कारण म्हणजे- ‘लगान’, ‘जोधा अकबर’फेम प्रख्यात सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या नावासमवेत नेहमीच काही वेगळेपण आढळून येतं.
प्रत्येक कलाकृतीसमवेत त्यांनी वैविध्य, संशोधन आणि उत्कृष्ट कलाकृतीचं सातत्य कायम ठेवलंय. स्टार प्लस वाहिनीवर लवकरच झळकण्या:या त्यांच्या एव्हरेस्ट मालिकेची काही क्षणचित्रं स्टार प्लस वाहिनीतर्फे दाखवण्यात आली, तेव्हा त्यातील थरार, रोमांच, भय, वास्तविकता आणि त्यामागील अभूतपूर्व मेहनत पाहून मन थक्क झालं नसेल तरच नवल!
निर्माता आणि लेखक आशुतोष गोवारीकर तर दिग्दर्शक ग्लेन-अंकुश असलेल्या या भव्य-दिव्य मालिकेचा खर्च अफाट आहे, या शब्दांत ‘स्टार’चे कार्यकारी संचालक गौरव बॅनर्जी यांनी सूतोवाच केलं. ते पुढे म्हणाले, आमच्या खर्चीक आणि अतिभव्य मालिकांपैकीच ही एक मालिका. नेहमी सास-बहूच्या चाकोरीबद्ध मालिका छोटय़ा पडद्यावर पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना ही नव्या - ताज्या विषयावरची थ्रिलिंग मालिका नक्कीच खिळवून ठेवेल.
प्रत्येक आम आणि खास माणसाच्या मनात त्याच्या स्वप्नाचं- महत्त्वाकांक्षांचं एक एव्हरेस्ट असतं.. हे एव्हरेस्ट चढावं अशी सुप्त इच्छा बाळगून असलेली व्यक्ती जीवनात आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करते आणि सच्चईनं मार्गक्रमण करीत असताना त्यांना त्यांचं एव्हरेस्ट साध्य होतं.
माङयाही एव्हरेस्टमधील नायिका अंजली तिला अशक्यप्राय असणारं एव्हरेस्ट काबीज करते. मला गिर्यारोहण, पर्वतारोहण नेहमी आकर्षित करत आलंय, जे मला शक्य झालं नाही. शेवटी एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखराला आकर्षण बिंदू ठेवत दोन वर्षाच्या अथक प्रयासानंतर एव्हरेस्टची निर्मिती केली. आशुतोष गोवारीकर पुढे सांगतात, छोटय़ा पडद्याशी माङो नाते जुने आहे. कच्ची धूप, सर्कस मालिकांमध्ये मी अभिनय केला, त्यानंतर छोटय़ा पडद्यासाठी निर्मात्याच्या रूपात एव्हरेस्टची निर्मिती केली, संकल्पना - लेखन माझं असलं तरी माङया सदाबहार, परिश्रमी टीमशिवाय हा एव्हरेस्ट चढणं मला अशक्य कोटीतलं होतं.
उणो सहा तापमान, बर्फाळ वातावरण, तेथेच राहणं - झोपणं, खाण्यास फक्त नूडल्स, शरीरावर उबदार कपडय़ांचे सहा जोड घालूनही हाडं गोठवून टाकणारी प्रचंड थंडी, क्षणाक्षणाला बदलणारं तापमान हे सारं कल्पनेबाहेरचं होतं. 12 हजार फूट उंचीवर इतक्या मोठय़ा युनिटला अवजड कॅमेरा, सामान-सुमानासह सुरक्षित नेऊन चित्रण करणं हे माङयासाठी साक्षात एव्हरेस्ट चढल्याचाच आनंद देणारं होतं.. असं सांगताना आशुतोषच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.
छोटय़ा पडद्यावर सास-बहू मालिकांनी धुमाकूळ घातला असला तरी, मनोरंजन करणा:या या मालिका आहेत, त्यातूनही जीवनातलं नाटय़ शिकता येतं, असंही आशुतोष यांनी आवजरून सांगितलं.
च्जगातील सर्वाधिक उंचीचं हिमशिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर यशस्वीरीत्या चढाई करणा:यांचा गौरव होतो, कारण ते आव्हान अशक्य कोटीतील असतं. आशुतोष गोवारीकर यांच्या एव्हरेस्ट मालिकेशी विविध क्षेत्रंतील असेच काही मान्यवर निगडित आहेत. या मालिकेला ऑस्कर विजेते पद्मभूषण संगीतकार ए.आर. रहमान यांचं संगीत लाभलं आहे.
च्डर्टी पिक्चर, बालगंधर्व, मोनेर मानुष सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठमोळे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी एव्हरेस्ट मालिकेतील कलाकारांना रंगभूषा केली आहे.
च्महेश आणो या मराठमोळ्या सिनेछायाचित्रकाराने ‘स्वदेस’ या आशुतोष गोवारीकर यांच्याच सिनेमातील छायांकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला होता. आजवर किमान एक हजार प्रसिद्ध जाहिरातींचे छायांकन केलेल्या महेश आणो यांनी हिमशिखरांचं सौंदर्य, त्यातला रोमांच अलगद टिपलाय.
च्युवा कलादिग्दर्शक अपर्णा रैना हिनं खोसला का घोसला, नेमसेक, माय फ्रेण्ड पिंटो यांसारख्या गाजलेल्या सिनेमांचे कलादिग्दर्शन केलंय. त्यामुळे आता एव्हरेस्ट मालिकेतील तिच्या कामाकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.