रोजा सोडून रक्तदान करणाऱ्या महिलेचा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:06 IST2021-05-08T04:06:59+5:302021-05-08T04:06:59+5:30

उद्घाटनप्रसंगी उपस्थित आमदार व माजी राज्यमंत्री योगेश सागर म्हणाले की, खासदार गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतील विविध सामाजिक संस्थाच्या ...

MP Gopal Shetty felicitated the woman who donated blood after leaving Rosa | रोजा सोडून रक्तदान करणाऱ्या महिलेचा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला सत्कार

रोजा सोडून रक्तदान करणाऱ्या महिलेचा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला सत्कार

उद्घाटनप्रसंगी उपस्थित आमदार व माजी राज्यमंत्री योगेश सागर म्हणाले की, खासदार गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतील विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने ५००० पिशव्या रक्तदानाचा संकल्प आता लवकरच पूर्ण होत आहे. अशावेळी खासदार शेट्टी यांच्या प्रेरणेतून आम्ही उत्तर मुंबईची ब्लड बँक पुढच्या एक वर्षात उभारू, अशी घोषणा त्यांनी केली.

नगरसेवक कमलेश यादव यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०२ युनिट रक्त संकलन झाले, तर श्री पार्श्वकीर्ती जैन फाउंडेशन संस्थेच्या सहकार्याने भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष संकल्प शर्मा आणि महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती सोमपुरा यांच्यावतीने झालेल्या या शिबिरात एकूण १९७ पिशवी रक्त संग्रह झाले.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, रक्तदाता व रक्तपेढीचे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

Web Title: MP Gopal Shetty felicitated the woman who donated blood after leaving Rosa