Join us

त्यानंतरच एल्फिन्स्टनचा पूल तोडावा; खासदार अरविंद सावंत यांचे पालिका आयुक्तांना पत्र

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 9, 2025 20:22 IST

प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉप पर्यंत पादचारी पूल उभारल्यानंतरच एल्फिन्स्टनचा पूल तोडावा

मनोहर कुंभेजकर, मुंबई-उद्धव सेनेचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे एल्फिस्टन येथील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या पूलाच्या  तोडकामाबाबत पत्र लिहुन संभावित गैरसोयींकडे लक्ष वेधले आहे. प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉप पर्यंत पादचारी पूल तयार होत नाही तो पर्यंत हा पूल तोडण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.

एल्फिन्स्टन येथील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा पूल तोडण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. खासदार अरविंद सावंत यांनी प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉप पर्यंत पूल बांधण्यासाठी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. विशेष म्हणजे पूर्वेला के. ई. एम. हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल ही रुग्णालये, महर्षी दयानंद कॉलेज तसेच अनेक आस्थापने आहेत. जर एल्फिन्स्टनच्या पूलाला योग्य पर्याय उपलब्ध करून न देता पाडण्यात आला तर, अनेक रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी ह्यांचे अतोनात हाल होणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

प्रभादेवी स्थानकात उतरून विद्यार्थी येत असतात. हा पूल तोडला तर प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून येणारे व स्थानकात उतरून पूर्वेकडे येणारे रुग्ण, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी वर्ग या सर्वांचे अतोनात हाल होणार आहेत. कारण त्यांना या विभागात येण्यासाठी एक तर दादर स्टेशनच्या टिळक पुलाचा किंवा पुढे करी रोड पुलाचा वापर करून संपूर्ण वळसा घालून यावे लागेल.

त्यामुळे प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉप पर्यंत पादचारी पूल उभारल्यानंतरच हा पूल तोडण्यात यावा, अशी मागणी अरविद सावंत यांनी पालिका आयुक्तांना  पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :अरविंद सावंतशिवसेना