दागिने चोरांची चलती
By Admin | Updated: July 10, 2014 23:56 IST2014-07-10T23:56:49+5:302014-07-10T23:56:49+5:30
पोलीस आयुक्तालय क्षेत्रत सोनसाखळी चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. सहा महिन्यांत 144 घटना घडल्या आहेत.
दागिने चोरांची चलती
नामदेव मोरे - नवी मुंबई
पोलीस आयुक्तालय क्षेत्रत सोनसाखळी चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. सहा महिन्यांत 144 घटना घडल्या आहेत. 5क् पेक्षा जास्त टोळ्या सक्रिय असून मुंबईसह ठाण्यामधील आरोपी नवी मुंबईत येऊन दागिने हिसकावून पळ काढत आहेत.
ऐरोली सेक्टर 2क् मध्ये राहणा:या अपर्णा खिलारे या बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गणोश मंदिरापासून पायी जात होत्या. मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील
15 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याच वेळी वाशी सेक्टर 9 मधून पायी जाणा:या मंगला बर्गे या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 3क् हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरटय़ांनी हिसकावून नेली.
नवी मुंबई, पनवेलमध्ये रोज अशाप्रकारच्या घटना होत आहेत. चोरटय़ांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. धूम स्टाईल मोटारसायकल चालवून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरटे पसार होत आहेत. 2क्12 मध्ये 322 तर 2क्13 मध्ये 226 घटना घडल्या आहेत. या वर्षी पहिल्या सहा महिन्यात तब्बल 144 घटना घडल्या आहेत.
गुन्हे शाखेने सहा महिन्यात जवळपास 5क् गुन्हे उघडकीस
आणले असून पोलीस स्टेशनअंतर्गत जवळपास 25 गुन्हे उघडकीस
आले आहेत. अनेक आरोपी जेरबंद झाले तरी हे गुन्हे थांबत नाहीत. पोलीस उपआयुक्त श्रीकांत पाठक यांच्या मते अशा प्रकारचे गुन्हे करणा:या जवळपास 5क् टोळ्या सक्रिय आहेत. मुंब्रा, भिवंडी, आंबिवली, शिवाजीनगर, भिवंडी परिसरातील आरोपी नवी मुंबईत येत आहेत. या टोळ्यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
4सोनसाखळी चोरी करणा:या टोळ्यांनी राज्याच्या सीमाही ओलांडल्या आहेत. मुंबई, ठाणो, नवी मुंबईत गुन्हे करण्याबरोबर अनेक जण गुजरात व इतर ठिकाणी जावूनही चोरी करत आहेत. आतार्पयत अटक केलेल्या आरोपींनी सुरत, अहमदाबादमध्येही चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे.
पैसे कमविण्याचा सोपा मार्ग
4सोनसाखळी चोरी हा पैसे कमविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग झाला आहे.
4मोटारसायकलवरून धूम स्टाईल येवून चोरटे काही क्षणात 1क् हजार ते लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावतात.
4चोरीचे दागिने विकत घेणारेही असल्यामुळे काही क्षणात हजारो रुपये मिळत आहेत.
4शिवाय सापडले तरी शिक्षा जास्त होत नाही यामुळे चोरटय़ांसाठी सोनसाखळी चोरी हा पैसे कमविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग झाला आहे.
कुटुंबाचाही समावेश
पोलिसांनी या महिन्यात दोन टोळ्या जेरबंद केल्या आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये चोरी केलेले दागिने विकण्यासाठी बहिणीने मदत केल्याचे उघड झाले असून दोन्ही महिला आरोपींना अटक झाली आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांना दागिने विकण्यास कुटुंबीय मदत करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.