Join us  

मान्सून पुढे सरकेना; अद्याप कर्नाटकच्याच वेशीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 3:16 AM

पूर्व उपनगरात जोरदार बरसला; मुंबई शहरात पावसाचे प्रमाण कमी

मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या वायू या चक्रीवादळाचा फटका मान्सूनला बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या वेशीवर रेंगाळला असून, वायू या चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात मुसळधार तर मराठवाडा, विदर्भात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट होती. तर, मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाल्याचे नोंद हवामान विभागाने केली आहे.पूर्व उपनगरात गुरुवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, साकीनाका, भांडुपसह लगतच्या परिसरात पावसाने तुफान हजेरी लावली. पूर्व उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते.राज्यासाठी अंदाज१४, १५ आणि १६ जून : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा कोरडा राहील.१७ जून : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल.मुंबई राहणार ढगाळ१४ आणि १५ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील.सहार गावात झाड कोसळून दोन जण जखमीच्गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील सहार गाव येथे झाड कोसळून दोन जण जखमी झाले. कुपर रुग्णालयात दोन्ही जखमींना दाखल करण्यात आले. दोघांपैकी एक जखमी सायमन बल्लपा हा सात वर्षाचा मुलगा असून, त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर सुलोचना बल्लपा यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कोसळलेल्या झाडाच्या फांद्या कापण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले होते.च्गेल्या २४ तासांत शहरात ४३ ठिकाणी, पूर्व उपनगरात २९ ठिकाणी, पश्चिम उपनगरात ५९ ठिकाणी अशा एकूण १३१ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.च्शहरात १३ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ ठिकाणी, पश्चिम उपनगरात ७ ठिकाणी अशा एकूण २३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.च्२४ तासांतील पावसाची नोंद : शहर १३.५ मिमी, पूर्व उपनगर ७.११, पश्चिम उपनगर १३.५. 

टॅग्स :मुंबईपाऊसमानसून स्पेशल