Join us

लोकल प्रवासात पाहता येणार चित्रपट, मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 06:27 IST

Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, मोबाईलवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर सेवा वापरण्यासाठी इंटरनेट डेटाची गरत नाही.

मुंबई :  मध्य रेल्वे प्रवाशांना नववर्षाची भेट देणार आहे. जानेवारीच्या मध्यात बहुप्रतिक्षित ‘कंटेंट ऑन डिमांड’ सेवेच्या प्रारंभासह मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना मोबाईल डिव्हाईसवर चित्रपट, टेलिव्हिजन शो आणि गाणी पाहता येणार आहेत. 

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, मोबाईलवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर सेवा वापरण्यासाठी इंटरनेट डेटाची गरत नाही. रेल्वे प्रशासनाने अधिकाधिक नॉन-फेअर महसूल मिळविण्याच्या उद्देशाने ही सेवा देण्याचा निर्णय घेतला. ही सेवा प्रवाशांसाठी मोफत असली तरी रेल्वे सेवा प्रदात्यांकडून जाहिरातींद्वारे खर्च वसूल करणार आहे.

सध्या दोन लोकल गाड्यांवर आवश्यक उपकरणे बसविण्याचे काम आधीच पूर्ण झाले असून, सध्या आणखी आठ गाड्यांवर उपकरणे बसविली जात आहेत. ही प्रक्रिया १० जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. एकदा या १० लोकल गाड्यांवर  आवश्यक उपकरणे बसविल्यानंतर सेवा सुरू केली जाणार आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलमध्य रेल्वे