Join us  

‘...तर बेस्ट कामगार करणार आंदोलन’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 6:01 AM

बेस्ट कामगारांना दिवाळीपूर्वी ५ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय बेस्ट समितीने सभेमध्ये घेतला आहे.

मुंबई  - बेस्ट कामगारांना दिवाळीपूर्वी ५ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय बेस्ट समितीने सभेमध्ये घेतला आहे. मुळात मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस जाहीर केल्यानंतर बेस्ट कर्मचा-यांना दिलेला बोनस म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्याची टीका बेस्ट इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी केली आहे. तसेच बोनसची रक्कम वेतनातून कपात करण्याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नसल्याने पगारातून ती कापल्यास बेस्ट कामगार आंदोलन करतील, असा इशारा गायकवाड यांनी दिला.गतवर्षी बेस्ट प्रशासनाने ५ हजार रुपयांची उचल कामगारांना दिली. पुढील १० महिन्यांत ही रक्कम वेतनातून कापून घेतली होती. त्यामुळे कामगारांमध्ये रोष आहे. यंदा रक्कम प्रशासनाने वेतनातून कपात केल्यास कामगार तीव्र आंदोलन करतील, असे गायकवाड यांनी शनिवारी याबाबत बोलताना सांगितले.

टॅग्स :बेस्टमुंबई