पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाने आंदोलनाचा सामान्यांना फटका

By Admin | Updated: July 16, 2014 00:36 IST2014-07-16T00:36:58+5:302014-07-16T00:36:58+5:30

नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारले.

The movement against the release of the municipal corporation employees | पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाने आंदोलनाचा सामान्यांना फटका

पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाने आंदोलनाचा सामान्यांना फटका

खालापूर : नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारले. खोपोली नगर पालिका कर्मचाऱ्यानी यात सहभाग नोंदवत पालिकेच्या कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले . यावेळी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पालिकेचे कार्यालयातील कर्मचारी, सफाई कामगार, पाणी पुरवठा, आरोग्य, आपत्कालीन विभाग अशा सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या गेटसमोर एकत्र येवून मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेवून चर्चा केली. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी देवराम मुके, त्रिंबक देशमुख ,दिलीप सोनावणे, मोहन मोरे, सचिन सोनावणे, महिला कर्मचारी आदि सर्वच कर्मचारी यामध्ये सहभागी झाले.

Web Title: The movement against the release of the municipal corporation employees