मनसेचे मॅगीविरोधात आंदोलन
By Admin | Updated: June 4, 2015 05:10 IST2015-06-04T05:10:15+5:302015-06-04T05:10:15+5:30
मॅगीमध्ये आढळलेल्या शरीरास हानिकारक घटकांमुळे त्याची विक्री बंद करण्याच्या हेतूने मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मॉलवर धडक दिली.

मनसेचे मॅगीविरोधात आंदोलन
नवी मुंबई : मॅगीमध्ये आढळलेल्या शरीरास हानिकारक घटकांमुळे त्याची विक्री बंद करण्याच्या हेतूने मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मॉलवर धडक दिली. यावेळी मॉलमधील मॅगी बाहेर काढून त्याची विक्री न करता विल्हेवाट लावण्याच्या सूचना मॉल प्रशासनाला देण्यात आल्या.
नवी मुंबईत अद्यापही दुकाने तसेच मॉलमध्ये मॅगीची विक्री सुरूच आहे. त्यामुळे मॅगीची ही विक्री बंद करावी याकरिता मनसेतर्फे ऐरोली, घणसोली व कोपरखैरणे येथे डी मार्ट या मॉलवर धडक दिली. यावेळी घणसोली व कोपरखैरणे येथील डी मार्टमधील मॅगी विक्रीसाठी बंद केल्याचे दिसून आले. परंतु ऐरोली येथे मॅगीची विक्री सुरूच होती. त्यामुळे मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश बानखिले यांनी कार्यकर्त्यांसह आत घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवले. मॅगी विक्रीसाठी ठेवलेली असतानाही मॉल प्रशासनाकडून त्यांची दिशाभूल करण्यात येत होती. यामुळे मॉल कर्मचारी व मनसे कार्यकर्ते यांच्यात वाद होवून तणाव निर्माण झाला होता.