गोराईमध्ये तरुणीचा विनयभंग
By Admin | Updated: May 14, 2015 01:12 IST2015-05-14T01:12:28+5:302015-05-14T01:12:28+5:30
मालाडच्या एका लॉजमध्ये सतरा वर्षीय मुलीचे अश्लील छायाचित्रण करून तिचा विनयभंग करण्यात आला होता. जवळपास वर्षभरापूर्वी घडलेल्या

गोराईमध्ये तरुणीचा विनयभंग
मुंबई : मालाडच्या एका लॉजमध्ये सतरा वर्षीय मुलीचे अश्लील छायाचित्रण करून तिचा विनयभंग करण्यात आला होता. जवळपास वर्षभरापूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार मंगळवारी गोराई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
सम्राट तांबे आणि अब्बास अशी या अटक संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील पीडित तरुणी ही नालासोपाऱ्यातील रहिवासी आहे. तांबेने ‘माझी फिल्म डायरेक्टरशी ओळख आहे. मी तुला त्याच्याशी भेट घालून देईन. मात्र तुला फिगर बनविण्यासाठी गोराईला येऊन काही औषधे घ्यावी लागतील,’ असे सांगितले. त्यानंतर गोराईला नेऊन त्याने अब्बास नावाच्या व्यक्तीशी मला भेटवले. ‘तो फिल्म डायरेक्टर असल्याचे मला सांगण्यात आले. या ठिकाणी त्यांनी मला दारू पाजून नंतर मला एक इंजेक्शन दिले. यामुळे मला गुंगी आली. ज्याचा फायदा उचलत या दोघांनी माझ्याशी अश्लील चाळे करत माझे विवस्त्र अवस्थेत छायाचित्रण केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार या पीडित तरुणीने गोराई पोलिसांकडे केली आहे. (प्रतिनिधी)