Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशाताईंचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाल्यावर शोक आवरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:31 IST

Asha Bhosle News: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पार्थिव रविवारी दुपारी साडेचार वाजता त्यांच्या लोअर परळ येथील कासा ग्रँड इमारतीतील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या असंख्य चाहत्यांना शोक आवरत नव्हता.

मुंबई - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पार्थिव रविवारी दुपारी साडेचार वाजता त्यांच्या लोअर परळ येथील कासा ग्रँड इमारतीतील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या असंख्य चाहत्यांना शोक आवरत नव्हता.

आशाताईंचे पार्थिव बीच कँडी रुग्णालयातून घरी आणण्यात आले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. अंत्यदर्शनासाठी शोकाकुल झालेले चाहते इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर दाखल झाले होते.

आज अंत्यसंस्कारासाठी कडेकाेट बंदाेबस्त : अंत्ययात्रेच्या कालावधीत वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येईल. पोलिसांनी लोअर परळ परिसर तसेच दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी अनेक व्हीव्हीआयपी, राजकीय नेते, तसेच चित्रपटसृष्टीतील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, विद्या बालन यांच्यासह आ. प्रसाद लाड, संगीतकार विशाल शेखर  आदींची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली.

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle's mortal remains arrive home; grief overwhelms mourners.

Web Summary : Asha Bhosle's body arrived at her Mumbai residence, drawing mourners. Cultural Minister Ashish Shelar was present. Security is heightened for the funeral, expecting VIPs. Chief Minister Fadnavis, Urmila Matondkar, Vidya Balan, and others paid their respects. Traffic diversions are in place.
टॅग्स :आशा भोसलेमुंबई