मोटारमनच्या सतर्कतेमुळे वाचले ट्रॅकवरील व्यक्तीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST2021-05-31T04:06:36+5:302021-05-31T04:06:36+5:30
टिळकनगर-चेंबूर स्थानकांदरम्यानची घटना; वेळेत ब्रेक लावल्याने अनर्थ टळला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लाेकल धावत ...

मोटारमनच्या सतर्कतेमुळे वाचले ट्रॅकवरील व्यक्तीचे प्राण
टिळकनगर-चेंबूर स्थानकांदरम्यानची घटना; वेळेत ब्रेक लावल्याने अनर्थ टळला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लाेकल धावत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेचे कर्मचारी आपले कर्तव्य चाेख बजावत आहेत. त्यामुळेच लाेकल नियाेजित वेळेत धावत आहेत. या कर्तव्यासाेबतच माणुसकीचे नाते जपत माेटारमन पी.के. रत्नाकर यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच गाडीचा ब्रेक दाबल्याने टिळकनगर-चेंबूर रेल्वेस्थानकांदरम्यान ट्रॅकवर पडलेल्या एकाचा जीव वाचला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून शनिवारी दुपारी २.१२ वाजता पनवेलसाठी सुटलेल्या लोकलमध्ये कर्तव्यावर असताना माेटारमन पी.के. रत्नाकर यांना टिळकनगर ते चेंबूरदरम्यान एक व्यक्ती रुळांवर पडलेली दिसली. टिळकनगर - चेंबूर विभागात न्यूट्रल सेक्शनमध्ये गाडी असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. त्यांनी तातडीने ब्रेक लावले आणि ट्रॅकवर असलेल्या व्यक्तीपासून अवघ्या १०-१२ मीटर अंतरावर ट्रेन थांबली. ट्रेनमधील प्रवाशांनी त्या व्यक्तीला ट्रॅकवरून सुरक्षित ठिकाणी नेण्यास मोटारमनला मदत केली. लोकलच्या गार्डकडून कंट्रोलला याची माहिती देण्यात आली. पी.के. रत्नाकर यांच्या प्रसंगावधानामुळे माेठा अनर्थ टळला.
दरम्यान, मोटारमनची सतर्कता आणि वेळेवर तसेच त्वरित केलेल्या कार्यवाहीमुळे एकाचा जीव वाचला. त्यांना योग्य पुरस्कार देण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
.............................................
===Photopath===
300521\1643-img-20210530-wa0010.jpg
===Caption===
मोटरमन