‘मास्टर की’ वापरून मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:31+5:302020-11-28T04:04:31+5:30
मुंबई : मास्टर की वापरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या १७ वर्षीय मुलाला सांताक्रुझ पोलिसांनी शुक्रवारी अटक करून त्याची रवानगी ...

‘मास्टर की’ वापरून मोटारसायकलची चोरी
मुंबई : मास्टर की वापरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या १७ वर्षीय मुलाला सांताक्रुझ पोलिसांनी शुक्रवारी अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार यांनी सापळा रचून त्याला माेटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याने मास्टर कीद्वारे मोटारसायकल लंपास करत असल्याची कबुली दिली. त्याच्यावर सांताक्रुझमध्ये ७, जुहू आणि वर्सोवात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून पाेलीस अधिक तपास करीत आहेत.