मातेनेच सोडली मुले सुधारगृहात

By Admin | Updated: July 10, 2014 08:49 IST2014-07-10T02:47:15+5:302014-07-10T08:49:23+5:30

नवरा सोडून गेला व आजाराने जखडलेले शरीर साथ देईनासे झाल्याने एका महिलेवर स्वत:च्या पाच मुलांना सुधारगृहाच्या हवाली करण्याची दुर्दैवी वेळ आली.

Mothers leave children in the house | मातेनेच सोडली मुले सुधारगृहात

मातेनेच सोडली मुले सुधारगृहात

पंढरीनाथ कुंभार - भिवंडी
पाच मुलांनंतर नव:याने सोडून दिलेल्या महिलेने गेली पाच वर्षे कष्ट करून मुलांना वाढवले. परंतु आजाराने जखडलेले शरीर साथ देईनासे झाल्याने त्या महिलेवर चार मुली व एका मुलास शहरातील सुधारगृहाच्या हवाली करण्याची दुर्दैवी वेळ आली. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने सुधारगृहातील सर्वाना गहिवरून आले. 
सिनेमातील दृश्याप्रमाणो हृदय पिळवटून टाकणा:या घटनेचे भिवंडीचे बालसुधारगृह साक्षीदार होते. पाच मुलांचा आक्रोश, मुलांना सोडताना तिळतिळ तुटणारा आईचा जीव आणि शेवटी हंबरडा फोडून बेशुद्ध झालेल्या त्या निराधार महिलेस लोकांनी धीर दिल्याने तिने परत येण्यासाठी मुलांना निरोप दिल्याच्या घटनेचा अनुभव घेताना सर्वाना गहिवरून आले होते. 
अंजली जैस्वाल (12), सागर (8), संजनी (7), राखी (6) व शहाद (5) अशा पाच निराधार भावंडांची नावे आहेत. मुंबईत रिक्षा चालवणा:या गुड्ड जैस्वालने ललिताशी लग्न केल्यानंतर त्याच्यापासून झालेल्या पाच मुलांना सोडून तो एका महिलेसोबत पळून गेला. भाडय़ाच्या खोलीत राहून मुलांना सांभाळताना ललितास हृदयाचा आजार जडल्याने ती भाडे देऊ शकली नाही. तेव्हा तिला घरमालकाने खोलीबाहेर काढले. तेव्हा नालासोपारा येथील तिची मैत्रीण सीतासोबत ती राहत होती. आजाराच्या निमित्ताने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सीताला देखील मुलांना पोसणो कठीण झाले. तिने त्या मुलांना भिवंडीस आणून शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याबाहेर सोडले व निघून गेली. ती निराधार मुले पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली व त्यांना बालसुधारगृहात दाखल केले. ही घटना मुलांची आई ललितास समजताच तिने आज दुपारी मुलांकडे धाव घेतली. परंतु, हृदयाचा आजार व परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद नसल्याने तिला रिकाम्या हाताने परतावे लागले. मुलांची झालेली परवड पाहून तिने बालसुधारगृहातच हंबरडा फोडला व बेशुद्ध झाली. या घटनेने सुधारगृहातील सर्वाचे हृदय पिळवटून गेले. शासनाने कितीही योजना जाहीर केल्या तरी त्या गोरगरिबांर्पयत पोहोचत नसल्याने त्यांना जेवणाची भ्रांत असते. त्यांची परवड कोणीच थांबवू शकत नाही, हे सत्य पुन्हा समोर आले.  (प्रतिनिधी)

 

Web Title: Mothers leave children in the house