आईनेच फेकले मुलीला कचराकुंडीत

By Admin | Updated: June 4, 2016 02:58 IST2016-06-04T02:58:01+5:302016-06-04T02:58:01+5:30

वाडिया रुग्णालयातून गायब झालेल्या चिमुरडीला तिच्या आईनेच सातरस्ता येथील कचराकुंडीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली

The mother has been thrown in the garbage | आईनेच फेकले मुलीला कचराकुंडीत

आईनेच फेकले मुलीला कचराकुंडीत

मुंबई : वाडिया रुग्णालयातून गायब झालेल्या चिमुरडीला तिच्या आईनेच सातरस्ता येथील कचराकुंडीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली. या प्रकरणी आई संपदा बामणेकडे आग्रीपाडा पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्यात ती वारंवार जबाब बदलत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
३० एप्रिल रोजी एका खासगी रुग्णालयात संपदाने या मुलीला जन्म दिला. जन्म झाल्यापासून ही मुलगी आजारी असल्याने आई त्रस्त झाली. ती पुन्हा आजारी पडल्याने संपदाने तिला वाडिया रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात नातेवाइकांना प्रवेश नसल्याने जोरे दाम्पत्य अतिदक्षता विभागाच्या परिसरात बसले होते. बुधवारी सकाळी मुलगी गायब झाल्याचे तेथील कक्षसेवकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ वरिष्ठांना याची सूचना दिली. या प्रकरणी संपदाला अटक होण्याची शक्यता आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक सरंबळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The mother has been thrown in the garbage