मुंबई - देशांतर्गत किंवा विदेशात प्रवास करायचा असेल, तर प्रवाशांना देशातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतून केलेला विमान प्रवास सर्वात महागडा पडतो.मुंबई ते गोवा विमानाने जाण्यासाठी ६५०० रुपये दर आहे, तर बंगळुरू ते गोवा जाण्यासाठी फक्त २५०० रुपये दर आहे. मुंबई ते कोची ९००० रुपये तर, बंगळुरू ते कोची जाण्यासाठी सर्वात कमी ३००० रुपये द्यावे लागतात. मुंबई ते कोलकाता जाण्यासाठी ८५०० रुपये तिकीट दर आहे, तर हैदराबाद येथून कोलकाता जाण्यासाठी ४४०० रुपये द्यावे लागतात. मुंबई ते दुबई जाण्यासाठी २० हजार रुपये तिकीट दर आकारला जात असताना चेन्नई येथून दुबईला विमानाने जाण्यासाठी केवळ १५ हजार रुपये तिकीट आहे. चेन्नई ते सिंगापूर जाण्यासाठी १० हजार रुपये तिकीट असताना मुंबईतून सिंगापूरला जाण्यासाठी मात्र तब्बल ३० हजार रुपयांचे तिकीट काढावे लागते.
देशातील सर्वाधिक महागडा विमान प्रवास मुंबईतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:27 IST