Join us  

मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 6:48 AM

राज्यात आतापर्यंत १३ लाख ३९ हजार कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९१ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.६६ टक्के झाला आहे; तर दुसरीकडे पुणे, ठाणे आणि मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक ५८,९३२ सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्याखालोखाल ठाण्यात २९,९७५, मुंबईत २६,७१६ आणि नाशिक, नागपूरमध्ये प्रत्येकी १६ हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण २ लाख ७३ हजार २२८ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात रविवारी कोरोनाचे १८ हजार ५६ रुग्ण आढळले, तर ३८० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ३९ हजार २३२ झाली असून, बळींचा आकडा ३५,५७१ झाला. दिवसभरात १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १० लाख ३० हजार १५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६५ लाख ६५ हजार ६४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०.४० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १९ लाख ६४ हजार ६४४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ३०,२४७६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्केमुंबईत आतापर्यंत १ लाख ६२ हजार ९३९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, २६ हजार ७१६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहोचले असून, रुग्ण दुपटीचा काळ ६२ दिवसांवर गेला आहे. मुंबईत रविवारी २ हजार २६१ कोरोना रुग्णांचे निदानझाले, तर ४४ मृत्यूंची नोंद झाली. शहर-उपनगरात एकूण १ लाख ९८ हजार ८६४ कोरोनाबाधित असून, मृतांचा आकडा ८ हजार ७९४ झाला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्ट्यांमध्ये ७६७ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. तर १० हजार २८९ सीलबंद इमारती आहेत.

टॅग्स :पुणेठाणेमुंबई