डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 01:59 AM2020-06-15T01:59:36+5:302020-06-15T01:59:43+5:30

मुंबई : गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघितली असता एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के  रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात ...

Mosquito breeding grounds in about 80% of dengue patients | डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थाने

डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थाने

Next

मुंबई : गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघितली असता एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के  रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाºया या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते.

सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणूवाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचा पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्टस, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाºया ताटल्या, वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यातही या डासांची उत्पत्ती आढळून आली आहेत.

आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही उघड्यावर साचलेले पाणी असणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका मुंबईकरांना मान्सून दाखल होता असतानाच करत आहेत.

डेंग्यू, मलेरियाला आळा बसावा यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची महापालिकेकडून तपासणी करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात ही तपासणी मोहीम स्वरूपात केली जाते.

आता ही मोहीम १३ मेपासून सुरू करण्यात आली आहे. तपासणी मोहिमेदरम्यान आढळून आलेली डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात केली जात आहेत. हे करताना मास्क वापरणे, हात मोजे वापरणे, शारीरिक दुरीकरण काटेकोरपणे पाळणे यासारख्या बाबींची परिपूर्ण दक्षता घेतली जात आहे. महापालिकेच्या कीटकनाशक खात्यातील १ हजार ५०० कामगार, कर्मचारी व अधिकारी मुंबई शहर आणि उपनगरात सर्वेक्षण करत आहे.

याची होते तपासणी : इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असलेल्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्यापाणी असणाºया शोभेच्या वस्तू , नारळाच्या करवंट्या, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या.

Web Title: Mosquito breeding grounds in about 80% of dengue patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.