मुंबई - आलिशान सजावट केलेल्या भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानातील बंगल्यात महापौर रितू तावडे मे अखेरीस प्रवेश करणार आहेत. ऐतिहासिक आणि लाकडी संरचना असलेल्या या हेरिटेज बंगल्यात महापौरांना काही सुधारणा व सजावट करायची आहे. या नूतनीकरणावर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे.
दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्याने भायखळा येथील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्याचे महापौर निवासात रूपांतर झाले होते. तेव्हापासून याच ठिकाणी मुंबईच्या महापौरांचे वास्तव्य असते.
वाळवी प्रतिबंधक उपायपालिका निवडणुकीनंतर तावडे महापौरपदी विराजमान झाल्या. मात्र, बंगल्यातील अंतर्गत सजावट आणि अतिरिक्त कामांमुळे त्यांचा गृहप्रवेश लांबणीवर पडला आहे. हा बंगला पुरातन वास्तू या गटात मोडत असल्याने पुरातन वास्तू विभागाच्या नियमांच्या अधीन राहून दुरुस्ती करण्यात आली आहे. हा बंगला पूर्णपणे लाकडी असल्याने वाळवी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली आहे.
नियोजित बदल बंगल्याची शोभा वाढविण्यासाठी तळमजल्यावर इटालियन मार्बल, ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारी आकर्षक झुंबरे आणि विशेष प्रकाशयोजना.अत्याधुनिक सोयीसुविधांसह स्वयंपाकगृहाचे पूर्णपणे नूतनीकरण.तळमजल्यावर पाहुण्यांसाठी नवीन शयनकक्ष, बैठकीसाठी दालन आदी.
Web Summary : Mumbai's Mayor Ritu Tawde will soon move into her renovated Byculla bungalow. The ₹3.5 crore revamp of the heritage structure includes Italian marble, new lighting, and a modernized kitchen. The housewarming is planned for the end of May after renovations, including termite prevention, are complete.
Web Summary : मुंबई की महापौर रितु तावडे जल्द ही अपने नवीनीकृत भायखला बंगले में प्रवेश करेंगी। ₹3.5 करोड़ के नवीनीकरण में इटैलियन मार्बल, नई लाइटिंग और एक आधुनिक रसोई शामिल है। दीमक की रोकथाम सहित नवीनीकरण पूरा होने के बाद मई के अंत में गृहप्रवेश की योजना है।