Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत दोन हजारांहून अधिक ठिकाणी होणार मतदान केंद्रांची व्यवस्था; कुर्ला, चांदिवली येथे १३८ ठिकाणी सुविधा 

By सीमा महांगडे | Updated: December 23, 2025 11:01 IST

मतदान केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प या सुविधांसाठी पालिकेकडून प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

- सीमा महांगडेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी २६ प्रशासकीय विभागात दोन हजार १३७ ठिकाणी मतदार केंद्र उभारण्यात येणार आहेत.  चांदिवली, कुर्ला परिसराच्या ‘एल’ विभागात, १६ प्रभागांसाठी सर्वाधिक १३८ ठिकाणी तर चेंबूर, गोवंडी परिसर असलेल्या ‘एम पूर्व’ विभागात १३४ ठिकाणी मतदान केंद्रे असतील. मुंबईत मतदारांच्या सोयीप्रमाणे १० हजार १११ मतदान केंद्रांची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणांची संख्या कमी जास्त होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प या सुविधांसाठी पालिकेकडून प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागाची जबाबदारी दिलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर या मतदान केंद्राची पाहणी, पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर झाल्यावर मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदार साहाय्य केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वॉर्डएकूण प्रभागकेंद्राचे ठिकाणमतदारांची संख्या
०३४४१,५५,५३९
बी०२२८१,००,००२
सी०३४९१,४८,६८७
डी०६८९३,०६,८६०
०७८५३,२०,४६९
एफ उत्तर१०११०३,८९,१४२
एफ दक्षिण०७७३३,२४,४१४
जी उत्तर१११२५४,६५,९५६
जी दक्षिण०७६४३,५१,६४४
एच पूर्व१०७५४,२७,८२०
एच पश्चिम०६६२२,९४,३१०
के पूर्व०७५५६,९२,९५५
के उत्तर०८५७४,११,६५९
के पश्चिम१३११६६,२६,०३५
एल१६१३८७,६५,०३८
एम पूर्व१५१३४६,१७,४५७
एम पश्चिम०७६८३,४६,५७२
एन१११२१५,१०,३८९
पी पूर्व१०६९३,५६,८६३
पी उत्तर०८६७८,१६,६१४
पी दक्षिण०९८०४,१०,८१३
आर मध्य१०८५४,८५,५८१
आर उत्तर०८६८३,३४,९५१
आर दक्षिण१३९६५,७३,२६२
एस१४१०१५,८१,८२९
टी०६७८२,९७,९७६
English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai to have 2,000+ polling locations; 138 in Kurla, Chandivali

Web Summary : Mumbai will establish 2,137 polling centers across 26 administrative wards for the upcoming municipal elections. Kurla and Chandivali's 'L' ward will have 138 locations, the most. The 'M East' ward has 134. Facilities like electricity, water, and ramps will be provided.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६