गेल्या वर्षापेक्षा यंदा सात कोटींची अधिक भातखरेदी

By Admin | Updated: May 7, 2014 00:24 IST2014-05-06T18:24:07+5:302014-05-07T00:24:34+5:30

आधारभूत भातखरेदी योजनेत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सहा कोटी ९६ लाख ९०७ रुपयांची अधिक भातखरेदी करण्यात आली आहे.

More than seven crore more takers this year than last year | गेल्या वर्षापेक्षा यंदा सात कोटींची अधिक भातखरेदी

गेल्या वर्षापेक्षा यंदा सात कोटींची अधिक भातखरेदी

भातसानगर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक, उपप्रादेशिक कार्यालय शहापूर, आधारभूत भातखरेदी योजनेत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सहा कोटी ९६ लाख ९०७ रुपयांची अधिक भातखरेदी करण्यात आली आहे.
शेकडो क्विंटल भात गोदामांमध्ये शिल्लक असताना याही वर्षी महामंडळाने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडून भातखरेदी केला आहे. या वर्षी साधारण भाताला १३१० रुपये तर बोनस रकमेसह २०० जादा भाव देण्यात आला. विशेष म्हणजे अति उत्तम प्रतीचा भात या केंद्रावर आला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी ४६ हजार ४१२.१५ क्विंटल भात पाच कोटी ८० लाख १५ हजार १८७ रुपयांना खरेदी करण्यात आला होता. २०१४ मध्ये शहापूर, किन्हवली, डोळखांब, खर्डी, मढ-अंबर्जे, टेंभे, धसई, माळ या शहापूर तालुक्यातील, तर मुरबाड तालुक्यातील कशेळे, पाथरज अशा १० खरेदी केंद्रांवर ११ कोटी ८१ लाख १२ हजार ९४ रुपये ३० पैसे इतक्या रकमेचा या वर्षी भातखरेदी करण्यात आला आहे. याविषयी उपप्रादेशिक व्यवस्थापक एल.एस. खाडे यांनी सांगितले की, मागीलपेक्षा या वर्षी वेळेवर भातखरेदी सुरू झाल्याने खरेदी अधिक झाली आहे.
(वार्ताहर)

Web Title: More than seven crore more takers this year than last year