राज्यात दिवसभरात १० लाखांहून अधिक जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST2021-09-02T04:12:44+5:302021-09-02T04:12:44+5:30

मुंबई : राज्यात सोमवारी १० लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. लसीचे डोस नियमित आल्यास लसीकरण मोहिमेस वेग येईल, ...

More than one million people are vaccinated in the state every day | राज्यात दिवसभरात १० लाखांहून अधिक जणांना लस

राज्यात दिवसभरात १० लाखांहून अधिक जणांना लस

मुंबई : राज्यात सोमवारी १० लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. लसीचे डोस नियमित आल्यास लसीकरण मोहिमेस वेग येईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात दिवसभरात १० लाख ३५ हजार ४१३ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात एकूण ५ कोटी ८२ लाख ५ हजार ९०४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ८६ लाख ७४ हजार १८२ जणांनी लसीचा पहिला डोस, तर २१ लाख ४ हजार ५१२ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३३ लाख १ हजार ५९१ जणांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी १२ लाख ७ हजार ६७९ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९२ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ९ लाख ९५ हजार २७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ३९ हजार ४६२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १४ लाख ६० हजार ९५१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Web Title: More than one million people are vaccinated in the state every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.