मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींनी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि २४ जूनपासून पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सीईटी सेल आणि प्रवेश प्राधिकरणाकडून घेण्यात आला. दरम्यान, मागील प्रवेशाच्या वेळी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा येत्या २ आठवड्यांत करण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. यासंबंधित अधिकृत परिपत्रक त्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर केले असून, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा करण्यात येणार आहे, अशांची यादीही जाहीर केली आहे.व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीची नोंदणी रद्द करण्यात आल्याने नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी जे पैसे भरले होते त्याचे काय, असा प्रश्न पडल्याने पालक-विद्यार्थी संभ्रमात होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शुल्क परतावा मिळणार आहे, अशा विद्यार्थ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. त्यांना त्यांच्या खात्यात त्यांनी ज्या पद्धतीने पैसे भरले होते, त्या पद्धतीनेच दोन आठवड्यांत ते परत केले जातील. यामध्ये अभियांत्रिकीच्या ४,७८०, फार्मसीच्या २,२३०, आर्किटेक्चरच्या ३,५८३ आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
लाखोंहून अधिक विद्यार्थ्यांचे पैसे सीईटी सेल करणार परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 06:04 IST