बलात्कारी प्ले स्कूल चालकाची आणखी कृष्णकृत्ये उजेडात

By Admin | Updated: January 18, 2015 23:16 IST2015-01-18T23:16:26+5:302015-01-18T23:16:26+5:30

मोलकरणीवर अनेक वर्ष बलात्कार करून तिचा अनन्वीत छळ केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या येथील प्ले स्कूल चालकाच्या पत्नीनेही या मोलकरणीवर भयानक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

More artificial works of rapist play school driver awoke | बलात्कारी प्ले स्कूल चालकाची आणखी कृष्णकृत्ये उजेडात

बलात्कारी प्ले स्कूल चालकाची आणखी कृष्णकृत्ये उजेडात

विरार : मोलकरणीवर अनेक वर्ष बलात्कार करून तिचा अनन्वीत छळ केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या येथील प्ले स्कूल चालकाच्या पत्नीनेही या मोलकरणीवर भयानक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
पिडीत युवतीने आपल्या पूरक अर्जात या अत्याचारांची दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. प्ले स्कूल मध्ये येणाऱ्या विद्यार्थीनींचा हा स्कूल चालक सतत विनयभंग करीत असे त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत असे, असे करू नका असे ती आपल्या मालकाला आणि मालकिणीला सांगू लागली असता तिला कडाक्याच्या थंडीत एका खोलीच्या खिडक्या उघड्या ठेऊन व विवस्त्र अवस्थेत कोंडून रात्रभर ठेवण्यात आले. जेव्हा आपला नवरा मोलकरणीवर बलात्कार करतो हे स्कूल चालकाच्या पत्नीला कळाले तेव्हा त्याला हे प्रकार थांबविण्यास सांगण्याऐवजी त्याच्या पत्नीने सिगरेट आणि विडीने तिच्या गुप्तांगास असंख्य चटके दिले. आता तरी तू आमची कृष्णकृत्ये निमूटपणे सहन करशील, नाहीतर या पेक्षा भयानक शिक्षा तुला देऊ असे ती तिला धमकावत राहिली. माझे शरीर असे जखमी असतानादेखील या स्कूल चालकाने माझ्यावर अत्याचार करणे सुरुच ठेवले असे या युवतीने आपल्या अर्जात म्हटले आहे.

Web Title: More artificial works of rapist play school driver awoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.