सी-लिंकवर लागणार आणखी 70कॅमेरे

By Admin | Updated: September 7, 2014 01:56 IST2014-09-07T01:56:40+5:302014-09-07T01:56:40+5:30

वरळी सागरी सेतूची (सी-लिंक) उच्चभ्रूवर्गीयांचा ‘सुसाइड पॉइंट’ म्हणून होत असलेली ओळख पुसण्यासाठी प्रशासनाला आता जाग आली आहे.

More than 70 cameras will be installed on C-Link | सी-लिंकवर लागणार आणखी 70कॅमेरे

सी-लिंकवर लागणार आणखी 70कॅमेरे

जमीर काझी - मुंबई
वरळी  सागरी सेतूची (सी-लिंक) उच्चभ्रूवर्गीयांचा ‘सुसाइड पॉइंट’ म्हणून होत असलेली ओळख पुसण्यासाठी  प्रशासनाला आता जाग आली आहे. या मार्गावरील ये-जा करणा:या प्रत्येक वाहनधारकाच्या हालचालीवर आणखी 7क् क्लोज सर्किट टीव्ही  (सीसीटीव्ही) कॅमे:यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.  येत्या दोन महिन्यांत म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला पुलावरील विविध ठिकाणी ते बसविण्यात येतील. सध्याच्या सुरक्षारक्षकांची संख्या तातडीने दीडपटीने वाढविली जाणार आहे. तीन शिफ्टमध्ये अतिरिक्त दोन रक्षक वाढवून लिंकवर जास्त वेळ थांबणा:यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 
   महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), मुंबई पोलीस, वाहतूक नियंत्रण शाखा व सी-लिंक जकात वसुली समितीच्या वरिष्ठ अधिका:यांमध्ये संयुक्त बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक महानगराचे एक वैशिष्टय़ बनलेल्या राजीव गांधी सागरी सेतूवर गेल्या पंधरवडय़ात तब्बल 4 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सी-लिंकची ओळख आत्महत्येचे ठिकाण म्हणून बनत चालली आहे. त्यामुळे या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सर्व संबंधित घटकांच्या वरिष्ठ अधिका:यांना बोलावून चर्चा केली. या वेळी सी-लिंकच्या प्रत्येकी 5क्,  1क्क् मीटर अंतरावर सुरक्षारक्षक तैनात करणो शक्य नसल्याचे महामंडळाच्या अधिका:यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणो सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूंना जाळी बसविणो किंवा त्याच्या आकारामध्ये बदल करण्याचा विचार करण्यात आला. मात्र त्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी घेणो आवश्यक असल्याने त्यासाठी कालावधी लागेल, हे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे  तातडीची उपाययोजना म्हणून सध्या एका शिफ्टमध्ये 4 सुरक्षारक्षक असतात, त्यामध्ये आणखी दोघांची वाढ करण्यात येईल, जास्त वेळ पुलावर थांबणा:या वाहनधारकांना हटकण्याचे ते काम करतील, मार्गावर आणखी 7क् सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मुंबई प्रवेश ठिकाण सागरी टोल यंत्रणोचे अध्यक्ष व कार्यकारी व्यवस्थापक जयंत म्हैसकर यांनी सांगितले.  सागरी सेतूवर रेंगाळणा:यांना तातडीने दंड केला जाणार आहे.
 

 

Web Title: More than 70 cameras will be installed on C-Link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.