राज्यात दिवसभरात ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:08 IST2020-12-30T04:08:38+5:302020-12-30T04:08:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाचे ५ हजार ५७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १८ ...

More than 5,000 patients are corona free in a day in the state | राज्यात दिवसभरात ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाचे ५ हजार ५७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १८ लाख २० हजार २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर २.५६ टक्के असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. सध्या ५४ हजार ५३७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात मंगळवारी दिवसभरात काेराेनाच्या ३ हजार १८ रुग्णांचे निदान झाले असून ६८ मृत्यूंची नाेंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख २५ हजार ६६ झाली असून मृतांचा आकडा ४९ हजार ३७३ आहे. सध्या राज्यात २ लाख ८९ हजार ५६० व्यक्ती घरगुती, तर ३ हजार २०४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

.................................

Web Title: More than 5,000 patients are corona free in a day in the state