Join us  

५० हून अधिक भीषण स्फोटांनी हादरली डोंबिवली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 5:56 AM

एमआयडीसीत अग्नितांडव : केमिकल कंपनी जळून खाक

डोंबिवली : अतिधोकादायक रसायनांचा साठा असलेल्या मेट्रोपॉलिटन एक्झिम केमिकल्स या कंपनीच्या गोदामाला मंगळवारी दुपारी पाऊणच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे आवारातील रसायनांचे ड्रम एकापाठोपाठ फुटले आणि पन्नासहून अधिक स्फोट झाल्याने डोंबिवली अक्षरश: हादरली. नागरिकांत प्रचंड घबराट पसरली. दुपारच्या जेवणाच्या वेळी ही आग लागल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीतील रिअ‍ॅक्टरच्या स्फोटाच्या भीतीने जवळपास दोन किलोमीटरच्या परीघातील इमारती, कारखाने रिकामे करण्यात आल्याने परिसर निर्मनुष्य झाला. हाताला येईल त्या वस्तू घेऊन घरे सोडण्याची वेळ परिसरातील व्यक्तींवर आली.

मुंबईत सोमवारी जीएसटी भवनाला लागलेली आग, त्या आधी गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीच्या २-३ घटना पाहता अग्निकल्लोळाचे सत्र सुरूच असून हा परिसरा आगीच्या तोंडावर असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे प्रोबेस कंपनीतील स्फोटाची भीतीदायक आठवण ताजी झाली. डोंबिवली एमआयडीसीत अतिधोकादायक रसायनांचा साठा असलेल्या पाच कंपन्यांपैकी ही एक कंपनी होती. कंपनीत असलेल्या घातक रसायनांमुळे क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, क्षणाक्षणाला भडकणाऱ्या आगीमुळे व होणाºया स्फोटाने परिसर दणाणून गेला आणि कंपनी जळून खाक झाली. आणखी भीषण स्फोटांची शक्यता असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत एनडीआरएफची एक तुकडीही घटनास्थळी दाखल झाली.एमआयडीसी फेज २ येथे असलेल्या या केमिकल कंपनीत दुपारी जेवणाची वेळ होताच काही कामगार जेवणासाठी बाहेर पडले. कंपनीच्या आवारात ज्वालाग्राही रसायनांचा साठा असतानाही तेथे वेल्डिंगचे काम सुरु असल्याचे समजते. या वेल्डिंगची ठिणगी रसायनांच्या साठ्यावर पडली आणि कंपनीतील गोदामाला आग लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. सुरूवातीला आग विझवण्याचा प्रयत्न कंपनीतील काही कामगारांनी केला. मात्र, क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केल्याने आणि भडका उडाल्याने कंपनीत उरल्यासुरल्या कामगारांनी बाहेर पळ काढला. त्यामुळे जीवितहानी टळली. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रसायनांमुळे आगीची तीव्रता वाढत गेली. कंपनीतील केमिकलच्या ड्रम्सने पेट घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे, अंबरनाथ, तळोजा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आणि पाण्याच्या टँकरच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. क्षणाक्षणाला होणाऱ्या स्फोटांमुळे कानठळ््या बसणारे आवाज येत होते. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांबरोबरच कामगारवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीत कंपनी बहुतांशी जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.आगीचे भीषण स्वरुप पाहून पोलिसांनी कल्याण-शीळ रस्ता काही काळाकरिता बंद केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरात असणाºया कंपन्या आणि इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्याचबरोबर, आजूबाजूच्या परिसरातील सर्व शाळा सोडून देण्यात आल्या. कंपनीच्या आवारात असलेल्या केमिकलच्या साठ्याचा एकाचवेळी स्फोट झाला असता तर, दोन कि.मी. परिसरात मोठी हानी झाली असती. यामुळे खबरदारी म्हणून अग्निशमन दलाने परिसर निर्मनुष्य केला होता.बघे, हवशेगवशे यांना घटनास्थळापासून दूर पिटाळल्यावर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. आग जेवणाच्या सुटीच्या वेळीच लागल्याने आगीत कुणीही जखमी झाले नाही. मात्र त्यामुळे आगीच्या घटनेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. वेल्डिंगच्या ठिणगीमुळे आग लागल्याचे काही कामगार व कामगार संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे असले तरी अधिकृतपणे आग कशामुळे लागली हे आताच सांगता येणार नाही, असे अग्निशमन दल व पोलिसांनी स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे व पुन्हा आग लागू नये याकरिता पाण्याच्या फवारणीचे काम सुरु होते. रात्रीपर्यंत आग विझवण्यासाठी चार लाख लीटर पाणी वापरण्यात आले असून बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कुलिंग आॅपरेशन सुरू राहील, अशी माहिती केडीएमसीचे अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली.सेफ्टी आॅडिटमध्ये कंपनी होती उत्तमकल्याण : डोंबिवलीतील नागरी वस्तीशेजारी घातक रसायनांचे कारखाने सुरु ठेवून तुम्ही मरण पोसताय का, असा खडा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन फारसा कालावधी लोटला नसताना आणि धोकादायक व अतिधोकादायक कंपन्यांचे सर्वेक्षण सुरु असतानाच मेट्रोपॉलिटियन एक्झिम केमिकल कंपनीला आग लागल्याने डोंबिवलीकरांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मरणाची मंगळवारी साक्ष पटली. ज्या कंपनीला आग लागली त्या कंपनीचे सुरक्षा आॅडिट केले होते. -वृत्त/५मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांचे काय?लोकवस्तीला लागून असलेले धोकादायक कारखाने हटवण्याचे आश्वासन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याबाबतचा अहवाल पंधरवड्यात देण्यास सांगितले होते. त्यानंतरही फारशा हालचाली न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला.

टॅग्स :ठाणेआगडोंबिवली