मोखाडा: भरपाईची ३५० प्रकरणे पडून
By Admin | Updated: December 16, 2014 22:52 IST2014-12-16T22:52:46+5:302014-12-16T22:52:46+5:30
वादळी पावसामुळे होणारे नुकसान, पुरात वाहून जाणे, आग लागणे यामुळे होणाऱ्या आपत्तीसाठी शासनाकडून अनुदानित मदत दिली जाते

मोखाडा: भरपाईची ३५० प्रकरणे पडून
मोखाडा ग्रामीण : वादळी पावसामुळे होणारे नुकसान, पुरात वाहून जाणे, आग लागणे यामुळे होणाऱ्या आपत्तीसाठी शासनाकडून अनुदानित मदत दिली जाते. हे अनुदान तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे असते परंतु मोखाडा तहसिल कार्यालयात अशा प्रकारची ३५० प्रकरणे धूळखात पडली आहेत. ८ ते ९ महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप अजूनपर्यंत भरपाई अथवा अनुदान उपलब्ध झालेले नाही.
पूर्णत: अनुदान मिळणाऱ्या आपत्तीग्रस्तांना १५ हजार तर अंशत: नुकसान होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना ३ हजार २०० अशी मदत दिली जाते. परंतु, या तुटपुंज्या मदतीसाठी तहसिल कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजवूनही मदत मिळत नसल्याने नाराजी आहे. या बाबतचा पत्रव्यवहार तहसिल कार्यालयाकडून होत असून वरिष्ठांच्या दुर्लक्षीत कारभारामुळे आपत्तीग्रस्त लाभार्थी उपेक्षित राहीले आहेत. (वार्ताहर)