आरटीओ अधिकाऱ्यांची महिनाभर जनाजगृती
By Admin | Updated: July 7, 2015 23:46 IST2015-07-07T23:46:45+5:302015-07-07T23:46:45+5:30
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत रिक्षांना मीटर सक्ती असतांनाही डोंबिवलीत मात्र गेल्या दोन वर्षांपासून रिक्षाचालकांच्या मनमानी कारभार सुरु होता

आरटीओ अधिकाऱ्यांची महिनाभर जनाजगृती
डोंबिवली : मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत रिक्षांना मीटर सक्ती असतांनाही डोंबिवलीत मात्र गेल्या दोन वर्षांपासून रिक्षाचालकांच्या मनमानी कारभार सुरु होता. त्याला चाप बसवण्यासाठी कल्याण आरटीओचे अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी या ठिकाणीही प्रवाशांना हवे असल्यास ते सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रिक्षा संघटनांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही सक्ती चालकांना करण्यात येत असल्याने महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवाशांना पहिल्या टप्प्यासाठी २० रु. मोजावे लागणार आहेत.
रिक्षा संघटनेचे दत्ता मळेकर, शेखर जोशी, यांच्यासह नाईक यांनी त्यांच्या ताफ्यासह शहराच्या पूर्वेकडील रामनगर, भाजीमार्केट या परिसरात मंगळवारी संध्याकाळी भेट देत प्रवशांशी संपर्क साधला, तसेच आता या ठिकाणीही मिटरने प्रवासाची मुभा असल्याचे सांगत जनजागृती केली. आगामी काळात कोणत्याही रिक्षा चालकाने जर असा प्रवासाचे भाडे नाकरल्यास त्याच्यावर आरटीओ मार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या प्रवाशांना शेअर पद्धतीने प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी वेगळी रांग लावण्यात येईल, तसेच मीटरसाठी वेगळी रांग असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याणातील अशा पद्धतीने प्रवासाला मात्र अल्प प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सर्व्हेक्षणानंतर स्पष्ट केले. ज्या रिक्षाचालकांचे मिटर कार्यरत नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, तसेच ज्यांच्याकडे ते कार्यरत आहे, परंतू तरीही भाडे नाकारल्यास मात्र होणारी कारवाई नेमकी कोणी करावी याबाबत संभ्रम असल्याची माहिती नाईक यांनी दिली.