दीड महिन्यात १ लाख ८५ हजार २२९ कार्डधारकांनी घेतला ‘रेशन कार्ड पोर्टेबिलिटी’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:03 AM2020-12-23T04:03:52+5:302020-12-23T04:03:52+5:30

- प्रक्रियेदरम्यान तक्रारी नाहीच रेशनिंग नियंत्रक कैलास पगारे यांची माहिती हीच बातमी वापरा. गौरी टेंबकर - कलगुटकर लोकमत न्यूज ...

In a month and a half, 1 lakh 85 thousand 229 cardholders have availed the benefit of 'Ration Card Portability' | दीड महिन्यात १ लाख ८५ हजार २२९ कार्डधारकांनी घेतला ‘रेशन कार्ड पोर्टेबिलिटी’चा लाभ

दीड महिन्यात १ लाख ८५ हजार २२९ कार्डधारकांनी घेतला ‘रेशन कार्ड पोर्टेबिलिटी’चा लाभ

Next

- प्रक्रियेदरम्यान तक्रारी नाहीच

रेशनिंग नियंत्रक कैलास पगारे यांची माहिती

हीच बातमी वापरा.

गौरी टेंबकर - कलगुटकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एखादा दुकानदार धान्य देत नसेल तर रेशन कार्डधारकांना दुसऱ्या दुकानाचा पर्याय खुला करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यात मुंबई तसेच उपनगरात १ लाख ८५ हजार २२९ कार्डधारकांनी ‘पोर्टेबिलिटी’चा लाभ घेतल्याची माहिती मंगळवारी रेशनिंग नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शिधावाटप दुकानदारांकडून धान्य देण्यास नकार दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी संबंधित कार्यालयाला मिळाल्या आहेत. शासनाने रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा विकल्प उपलब्ध करून दिल्यानंतर मुंबईत नोव्हेंबर, २०२० पासून अद्याप १ लाख ८५ हजार २२९ जणांनी कार्ड पोर्ट केले. त्यांना आता कमी किंमत असलेल्या धान्याच्या दुकानातून ते प्राप्त करणे सोपे झाले आहे. मुंबईत परळ, अंधेरी, वडाळा, ठाणे आणि कांदिवली या रिजनमध्ये १९ लाख ९० हजार ८९० कार्डधारक आहेत. त्यापैकी १ लाख ८५ हजार २२९ कार्ड पोर्ट करण्यात आली आहेत. पत्ता बदलला अथवा कामासाठी इतरत्र राहावे लागत असल्याने ट्रान्स्फर करण्यात आलेल्या कार्ड्सची संख्या २२ डिसेंबर, २०२० पर्यंत १ लाख ९१ हजार २१८ इतकी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यात कोणताही गैरप्रकार होऊ नये यावरही संबंधित विभाग लक्ष ठेवून असल्याचेही काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘एईपीडीएस’ कार्डधारकांसाठी फायदेशीर

सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना रेशन मिळावे हा त्यांचा अधिकार असून त्यांना तो मिळावा यासाठी आम्ही पुरेपूर सहकार्य करीत आहोत. त्यात एईपीडीएस (Aadhaar enabled Public Distribution) सिस्टम फायदेशीर ठरत असून त्याच्या वापरामुळे अगदी सहजपणे त्यांना धान्य उपलब्ध होत आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान अद्याप तरी कोणतीही तक्रार आम्हाला मिळालेली नाही.

(कैलास पगारे - रेशनिंग नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक)

जिल्हे - एकूण कार्ड

(A) क्षेत्र परळ - १,६४,९०४

(D) क्षेत्र अंधेरी - २,३४,३८७

(E) क्षेत्र वडाळा - ५,४१,०२९

(F) क्षेत्र ठाणे - ७,६३,४३३

(G) क्षेत्र कांदिवली - २,८७,१३७

एकूण कार्ड : १९,९०,८९०

पोर्टेबिलिटी

कार्ड्स - ट्रान्सफर

२२,१९४ - २२,५७३

१८,१४७ - १८,३८४

५२,६५९ - ५४,१०३

७१,५८४ - ७५,४५३

२०,६४५ - २०,७०५

एकूण

१,८५,२२९ - १,९१,२१८

Web Title: In a month and a half, 1 lakh 85 thousand 229 cardholders have availed the benefit of 'Ration Card Portability'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.