माथेरानमध्ये पावसाळ्यात वर्तमानपत्रे बंद
By Admin | Updated: July 6, 2015 23:30 IST2015-07-06T23:30:12+5:302015-07-06T23:30:12+5:30
नियमित वर्तमानपत्र वाचकांना सकाळीच वर्तमानपत्र हाती पडून गावातील, तालुका, जिल्हा, राज्य, देशातील विविध घडामोडींची माहिती नजरेखालून गेल्याशिवाय चैन पडत नाही

माथेरानमध्ये पावसाळ्यात वर्तमानपत्रे बंद
माथेरान : नियमित वर्तमानपत्र वाचकांना सकाळीच वर्तमानपत्र हाती पडून गावातील, तालुका, जिल्हा, राज्य, देशातील विविध घडामोडींची माहिती नजरेखालून गेल्याशिवाय चैन पडत नाही. माथेरानमध्ये पावसाळ्यात चार महिने वृत्तपत्र बंद असल्याने वाचकांची मात्र गैरसोय होत आहे.
माथेरान या दुर्गम भागात आठ महिने उन्हाळ्यामध्ये मिनीट्रेनने सकाळी दहा वाजेपर्यंत गावात वर्तमानपत्रे येतात. परंतु पावसाळ्यात मिनीट्रेन चार महिने बंद असल्यामुळे घोड्यावरून पेपरची वाहतूक करावी लागते. एका घोड्याचे जवळपास दस्तुरीनाका ते गावापर्यंतच्या वाहतुकीसाठी १६० रुपये आकारले जातात. हे दर पेपर विक्रेत्याला परवडत नसल्यामुळे विक्रेत्याने पावसाळ्यात पेपर विक्री बंद केल्याने वाचकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. (वार्ताहर)