मुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन?

By Admin | Updated: May 17, 2015 01:58 IST2015-05-17T01:58:50+5:302015-05-17T01:58:50+5:30

शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात तर १० जूनला मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Monsoon arrival in Mumbai on June 10? | मुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन?

मुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन?

मुंबई : शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात तर १० जूनला मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत सांगितले की, मान्सून तळकोकणात दाखल होण्याची सरासरी तारीख ७ जून आहे; तर मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १० जून आहे. जेव्हा सरासरी तारीख दर्शविली जाते तेव्हा मान्सून त्याच काळात दाखल होईल, असे म्हणता येत नाही. जोपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होत नाही म्हणजे जोवर त्याचा भूमीवरील प्रवास सुरू होत नाही तोवर मान्सूनच्या पुढील प्रवासाचा तंतोतंत अंदाज वर्तविता येत नाही.
आता तो समुद्रावर म्हणजे अंदमानात असून, जेव्हा तो केरळमध्ये दाखल होईल आणि त्याचा उत्तरेकडील प्रवास सुरू होईल; तेव्हा त्याची मुंबईत दाखल होण्याची निश्चित तारीख सांगता येईल. अगदी भूतकाळ पाहिला तर यापूर्वी मे महिन्याच्या शेवटीही मान्सून मुंबईत दाखल झाला आहे; आणि अगदी एक महिना उशिरानेही मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. म्हणून आता दर्शविण्यात आलेल्या तारखा या सरासरी आहेत. (प्रतिनिधी)

च्नैर्ऋत्य मोसमी पावसाचे संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र व निकोबार बेटे तसेच दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, उत्तर अंदमान समुद्र, अंदमान बेटांच्या काही भागांत शनिवारी आगमन झाले आहे.
च्मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.
च्कोकणाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात घट झाली आहे.

Web Title: Monsoon arrival in Mumbai on June 10?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.